शुभमंगल विवाह योजना
शेतकरी, शेत मजुरांसह इतर प्रवर्गातील मुलींच्या सामूहिक विवाहास किंवा नोंदणीकृत विवाहास प्रोत्साहन देऊन विवाह समारंभावरील उधळपट्टी रोखणे.
पात्रता
१. वधुचे कुटुंबाचे वार्षिक कमाल उत्पन्न १ लाख रुपये असावे २. सामूहिक विवाहाचे आयोजन करणारी संस्था नोंदणीकृत असावी. एका सोहळ्यात
किमान ५ व कमाल १०० जोडप्यांचा समावेश. वर्षातून दोनदाच आयोजित ३. विवाह सोहळ्याच्या आधी एक महिना वधु-वरांची कागदपत्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास सादर करणे बंधनकारक
४. विवाह सोहळ्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, विवाह नोंदणी प्रमापत्र सादर करणे बंधनकारक
मिळणारा लाभ
- प्रति जोडपे १० हजार रुपये अनुदान वधुच्या आईच्या नावाने मिळते. आई हयात नसल्यास वडिलांच्या व दोघेही हयात नसल्यास मुलीच्या नावे अनुदान मिळते. - विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेस प्रति जोडपे दोन हजार रुपये - अनुदान
दिले जाते.
- योजना एसटी / एसटी, विशेष मागास प्रवर्गासाठी लागू नाही.
संपर्क
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा नियोजन विकास समिती.
No comments:
Post a Comment