माझी कन्या भाग्यश्री योजना
- मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे. या योजने ध्ये लाभार्थीचे दोन प्रकार करण्यात आले आहेत.
सुकन्या योजनेचा समावेश नव्याने सुरु करण्यात आलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' या
योजनेत करण्यात आल्यामुळे 'सुकन्या' योजनेच्या सर्व अटी व शर्ती 'माझी कन्या
भाग्यश्री' योजने ध्ये लागू करण्यात आले. लिंग निवडीस प्रतिबंध करणे
बालिकेचा जन्मदर वाढविणे
मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे
एका मुलीनंतर माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.
- दोन्ही मुली आहेत आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
केली आहे.
योजनेच्या प्रमुख अटी
मुलीच्या वडिलांनी महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक.
- कुटुंबातील एक मुलगी अथवा दोन मुलींना या योजनेचा लाभ घेता कुटुंबात एक मुलगी असेल, तर पहिल्या मुलीच्या जन्मानंतर आई वडिलांनी येईल.
1 वर्षाच्या आत नसबंदी करणे आवश्यक. कुटुंबात दोन मुली असतील आणि दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर आईने कुटुंब -
नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक,
- एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास या योजनेचे लाभ मिळणार नाहीत.
- सदर योजनेचा लाभ ऑगस्ट २०१७ व त्यानंतर जन्मलेल्या मुलींना घेता येईल. - ही योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. ७.५ लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबास मिळणारआहे.
लाभाचे स्वरूप
सुरुवातीला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत आई व मुलीच्या नावे संयुक्त खाते उघडण्यात येईल. यामध्ये ५००० रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट आणि १ लाख रुपये अपघात विमा या सुविधा मिळतील. - शासनामार्फत मुलीच्या नावे बँकेत रु. ५०,००० मुदत ठेव स्वरूपात ठेवण्यात
येतील. (दोन मुली असतील तर प्रत्येकी रु. २५०००) - जमा झालेली व्याजाची रक्कम मुलगी ६ वर्षांची झाल्यावर काढता येईल त्यानंतर
पुन्हा मुलगी १२वर्षांची झाल्यांनतर काढता येईल. अधे-मध्ये ही रक्कम काढता येणार नाही.
- मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला योजनेची संपूर्ण रक्कम काढता येईल..
(मुलगी दहावी उत्तीर्ण व अविवाहित असावी)
या योजनेचा लाभ बालगृहातील अनाथ मुलींना तसेच दत्तक मुलींनाही घेतायेईल. - दुर्दैवाने मुदतीपूर्वीच मुलीचा मृत्यू झाल्यास योजनेची रक्कम पालकांना देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
१. आधार कार्ड
२. बँक खात्याचे पासबुक
३. उत्पन्नाचा दाखला
४. रहिवासी दाखला
५. मुलीचा जन्मदाखला
६. पासपोर्ट साइज फोटो -२
अर्ज करण्याची पध्दत
सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. संपर्क
या योजनेबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग, तसेच तालुकास्तरावर एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment