गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-
नैसर्गिक आपत्ती अगर अपघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अगर अपंगत्वामुळे संबंधित शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर पडू नये यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
शेती व्यवसाय करताना होणारे अपघात तसेच वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात यामुळे बाधीत झालेल्या शेतकरी कुटुंबास मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या वीमा योजनेसाठी शेतकऱ्याला एकही रुपया भरावा लागत नाही. वीम्याचा हप्ता राज्य सरकार भरते.
पात्रता - राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार असलेले शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत.
- वीज पडणे, विजेचा धक्का, रस्ता-रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, नक्षलवादी हल्ला, सर्पदंश, जनावरांचा हल्ला, खून, दंगल आदी कारणामुळे मृत्यू पावणाऱ्या अगर गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला या योजने अंतर्गत नुकसानभरपाई दिली जाते.
आवश्यक कागदपत्रे -
सात-बारा उतारा, वारस नोंद उतारा (६ क), फेरफार (६ ड), तलाठी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शेतकरी मृत
झाल्यास शवविच्छेदन अहवाल पोलिसांचा प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) पंचनामा अपंगत्वाचे
टक्केवारी प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, अपघाताच्या स्वरुपानुसार विहीत केलेली कागदपत्रे, बँकेचे
पासबुक.
No comments:
Post a Comment