महाराष्ट्र शासना मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ आता तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र शासना मार्फत प्रत्येक जिल्ह्यातून किमान 80 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ घेता येणार, या योजनेचा शुभारंभ 15 एप्रिलपासून सुरू झाला आहे. ही योजना शेतकऱ्यानं साठी 15 जून पर्यंत चालू राहणार असून, या योजने मार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 27 लाख लाभार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम असे नियोजन करावे, असा आदेश आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या उपक्रमाचे नाव ‘जत्रा शासकीय योजनांची, असे देण्यात आले आहे. त्यांनी सांगितले आहे, जत्रा शासकीय योजनांची ही सर्वसामान्यांच्या विकासाची’ असे हे अभियान आहे. या योजनेचे समन्वयन मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षा अंतर्गत करण्यात येणार आहे.
जत्रा शासकीय योजनांची या अभियानाच्या अंमलबजावणी साठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. आपल्या राज्यामध्ये जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात येतात. परंतु, या योजनेसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक दस्तावेज विविध कार्यालयांत जाऊन जमा करणे, हे कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे, अशा विविध प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते.
आज आपल्या शासकीय योजनांच्या जत्रेचा शुभारंभ झाला आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांना गाई गोठा अनुदान बरोबरच घेता येणार आहे आणखी 40 योजनांचा लाभ, ही योजना तालुकास्तरावर आणि राज्यस्तरावर कशी राबवली जाणार या विषया बद्दल सविस्तर माहिती बघू या....
आपल्या जिल्ह्यातील दस्तावेज उपलब्ध करून देणारी कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत वारंवार जावे लागते. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते.
या मागील काळात असे ही घडले आहे, की कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योजनांचा लाभ सर्व गरजू शेतकरी व्यक्तींपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे या योजनांचा काहीही उद्देश पूर्ण होत नव्हता.
यासर्व गोष्टींचा विचार करता आम्ही यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण आदी ठिकाणी ‘जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ या नावाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमा मार्फत एकाच ठिकाणी सर्व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीतकमी कालावधीत देण्यात येणार आहे. आता हाच उपक्रम आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर राबवण्यात येणार आहे.
शासकीय योजनांची जत्रा या उपक्रम अंतर्गत नागरिकांना शासकीय योजने संदर्भात कार्यालयांचे प्रतिनिधी आणि सर्व दस्तावेज उपलब्ध करून देणारे अधिकारी आणि कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील अशी अपेक्षा करतो. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हाप्रमुख असतील आणि इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या वेळेत करण्यात येईल.
पूर्वतयारी मध्ये नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची सर्व माहिती देणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करून घेणे तसेच नागरिकांनकडून अर्ज भरून घेण्यात येतील.
महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असेल. सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर 2 दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. या उपक्रमाचा अहवाल जिल्हा जनकल्याण कक्षांना मुख्यमंत्री सचिवालयातील जनकल्याण कक्षास सादर करावा लागेल.
या उपक्रमा मार्फत मिळणारा लाभ:
सीमांत शेतकरी गट बांधणी तसेच गट नोंदणी,
कृषी अभियांत्रिकीकरण योजना,
शेती किट, बाजार किट, फवारणी किट, इ – श्रम कार्ड, स्व निधी योजना, इमारत बांधकाम योजना
रेशन कार्ड, आयुष्मान कार्ड, संजय गांधी व श्रावण बाळ योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, जात प्रमाणपत्र , रहिवासी, उत्पन्न, जन्म व मृत्यू इ. दाखले.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, बचतगटांना लाभ, हेल्थ कार्ड तसेच गाई , म्हशी व शेळी – मेंढी वाटप.
महिलांना शिलाई मशीन वाटप,
महालॅब योजना, रोजगार मेळावा, वीज जोडणी, माती परीक्षण,
अण्णासाहेब पाटील व इतर महामंडळाच्या योजना, शिकाऊ चालक परवाना, दिव्यांग साहित्य वाटप, महिलांना सखी किट वाटप, डिजिटल इंडिया अंतर्गत शासनाच्या डिजिटल सुविधांची माहिती व प्रशिक्षण, नवमतदार नोंदणी, मुलींना सायकल वाटप, मनरेगा, जि.प. व कृषी विभागाच्या घरकुल योजना, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग, विवाह नोंदणी, पी . एम . किसान योजना, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, शासकीय कर्मचारी आस्थापना विषयक प्रलंबित बाबी व सेवानिवृत्तीविषयक लाभ, कृषी सेवा केंद्राचे परवाने इ... सर्व योजना या उपक्रमा अंतर्गत राबविल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment