Sunday, 16 April 2023

जुनी पेन्शन योजने बाबत सरकारचा मोठा निर्णय.

Old Pension Scheme
जुनी पेन्शन योजने बाबत सरकारचा मोठा निर्णय.

   तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत तर तुमचा साठी आनंदाची बातमी. तुम्ही किंवा तुमचा कुटुंबातील कुणी केंद्रीय सरकारी कर्मचारी आहे, तर जुन्या पेन्शन संदर्भात तुमचा साठी एक खास बातमी आली आहे. या बातमीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळनार आहे. आपल्या सरकारने एक मोठे पाऊल घेत, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवडक समूहाला जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय दिला आहे. याबाबत कार्म‍िक मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, 22 डिसेंबर 2003 पूर्वी अधिसूचित केलेल्या पदांसाठी केंद्रीय सेवांमध्ये सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदा जुन्या पेन्शनचा पर्याय दिला जाणार आहे.
       त्यासाठी कर्मचाऱ्यांकडे 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचा वेळ दिला आहे.
22 डिसेंबर 2003 पासूनच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिसूचित केली होती. असे कर्मचारी केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, 1972 (आता 2021) अंतर्गत जुन्या पेन्शनसाठी पात्र ठरणार आहेत. हा पर्याय ओपीएस माध्यमाने निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचा वेळ दिलेला आहे. हा आदेश केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) कर्मचारी आणि अशा इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. जे 2004 मध्ये सेवेत रुजू झाले होते. कारण, त्यावेळी भर्ती प्रक्र‍ियेत प्रशासकीय कारणांमुळे उशीर झाला होता.

 सरकारचे अनावश्यक आर्थिक तारण वाढेल काय?

सरकारच्या या नर्णयानंतर, कर्मचाऱ्यांचे एनपीएसमधील योगदार सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) मध्ये जमा केला जाणार आहे. भारतातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सांगण्यात आले आहे की, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यानंतर सरकारवरील अनावश्यक आर्थिक ताण वाढेल असे सांगितले. या अगोदर छत्तीसगड, राजस्थान, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेस शास‍ित राज्‍यांनी या अगोदरच जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
    यामध्ये महत्वाचे म्हणजे, पात्र कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पर्याय निवडता येईल, असे सरकारने जारी केलेल्या आदेशात सांगितले आहे. मात्र शेवटच्या तारखेपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत ही निवड केली गेली नाही, तर उरलेल्या कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत कायम राहतील असे ही सांगितले आहे. तसेच एकदा वापरलेला पर्याय अंतिम असेल असेही या आदेशात म्हणण्यात आले आहे.
जुनी पेन्शन योजना सरकारी केंद्रीय कर्मचा्यांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...