Tuesday, 4 April 2023

महात्मा फुले जन आरोग्य योजना

  महात्मा फुले जन आरोग्य योजना


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना आरोग्य सुविधा देणे, दारिद्र्यरेषेखालील व वरील रुग्णांना गंभीर व खर्चिक आजारावरील मोफत उपचार देणे.

लाभार्थी

दारिद्र्यरेषेखालील पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना दारिद्र्यरेषेवरील केशरी शिधापत्रिका धारक, शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील पांढरे

शिधापत्रिकाधारक

शेतकरी, ही योजना राष्ट्रीय विमा कंपनीच्या सहकार्याने राबविली जाते. सारे ९०० आजारांवर या योजनेतून उपचार केला जातो.. या योजनेअंतर्गत विमा संरक्षण रक्कम प्रती वर्ष प्रतिकुटुंब २ लाख रुपये आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ३ लाख रुपये आहे. (यात वेळोवेळी बदल होतो.)

कागदपत्रे

स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, शिधापत्रिका, केंद्र व राज्य शासनाने विहित केलेले

कोणतेही ओळखपत्र.

संपर्क

सूचीबद्ध रुग्णालय सदर योजना बहुतांश रुग्णालयात लागू आहेत. तालुका, जिल्हा आरोग्य अधिकारी, खासगी रुग्णालयातील आरोग्य मित्र, समाजसेवक, लोकप्रतिनिधींचे कार्यालय.

No comments:

Post a Comment

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना 2023 ऑनलाइन आवेदन कैसे करे?     PM Mudra Yojana बड़े बदलाव करते हुए 10 लाख की जगह 20 लाख तक का बिज़नेस ल...